आपल्या स्वत:शी मैत्री म्हणजे आपल्या बुद्धी आणि मनाशी
मैत्री. त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना जपणे. आयुष्यातली वादळी
वर्ष आणि नंतरच्या आयुष्यात माझे निर्णय मी स्वत:साठी कशाप्रकारे घ्यायला पाहिजेत.
हे करताना घरच्यांच्या विचारांचे पाठबळ मिळाले तर आपल्या पंखात बळ येते. त्यासाठी
प्रथम स्वत:वर विश्वास ठेवायला शिकणे महत्वाचे. आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्याच
मनाने घेणे ही मुलींच्या दुष्टीकोनातुन
अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणुनच आपला कोणताही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या
सर्व परिणामांचा विचार करायचा. जबाबदारी स्विकारायची आणि कृती करायची अशी सवय
स्वत:ला लावुन घेतली पाहिजे.
आपल्या निर्णयाची सिद्धता आपल्या
स्विकारावर अवलबुन असते. मी अशी वागले, बोलले तर घरचे नातेवाईक , इतर काय बोलतील या एकाच विचाराने स्वत:चे मन मारुन जगण्याला
जगणे म्हणता येत नाही.
आपण पाच मिनीटे स्वत:सोबत असणे. हे विसरण्याचा ताण घालवून टाकणार असत. आपल्या थकवा
घालविणार असत. आपल्या जवळ असणारी बुद्धीमत्ता विचार
आपल्या स्वत:साठी, विकासासाठी,आनंदासाठी ,तुमचा तुम्हाला वापरता येण्यासाठी,तुम्ही
तुमची खिडकी उघडा.बाहेरची खेळती हवा तुम्हाला आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलायला
शिकवेल .याच साठी तुम्ही Edu Mirror च्या नव्या संकल्पना आणि
स्वत:ची आगळी वेगळी सर्वसमावेशक वेब फ्रोफाईल तयार करा.
आनंदाचा हिंदोळा तुमच्या अंगणात अवतरला आहे असे समजा !
No comments:
Post a Comment